केस गळणे (Hairfall) ही आजकाल मोठ्या प्रमाणावर आढळणारी समस्या आहे. धूळ, प्रदूषण, ताणतणाव, चुकीची जीवनशैली, अपुरा आहार यांचा थेट परिणाम केसांवर होतो.
डोके आणि मेंदूशी संबंधित आजारांमध्ये नस्य हे अत्यंत प्रभावी उपचार आहे. नस्य म्हणजे नाकावाटे औषध देणे.
नासा ही शिरसः द्वार आहे — नाक हे डोक्याचे प्रवेशद्वार आहे.
नाकावाटे दिलेले औषध केसांच्या मुळांपर्यंत (Hair follicles) पोहोचते आणि मेंदू, नसा व हार्मोन्सवर परिणाम करते.
रक्ताभिसरण सुधारते
केसांच्या मुळांना पोषण मिळते
केस गळणे कमी होते
हार्मोनल असंतुलनामुळे होणारे केस गळणे कमी होते.
सुमारे 50% केस गळणे हे ताणतणावामुळे होते. नस्यामुळे मानसिक ताण कमी होतो.
वात-पित्त दोष संतुलित होतो.
हळूहळू केसांची वाढ सुधारते.
नस्य → मेंदू → नसा → आराम
वेळ: सकाळी (8–10 am)
पोट: रिकाम्या पोटी किंवा हलका आहार घेतल्यानंतर
नस्य हा आयुर्वेदातील एक प्रभावी उपचार असून केस गळणे, ताणतणाव, डोकेदुखी आणि मानसिक थकवा यावर उपयुक्त आहे.
योग्य पद्धतीने व तज्ज्ञांच्या सल्ल्याने केल्यास चांगले परिणाम दिसून येतात.