केस गळणे आणि पोषक आहार यांचा संबंध

केस गळणे ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. बदलती जीवनशैली, ताणतणाव, प्रदूषण, हार्मोनल बदल आणि अयोग्य आहार यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढले आहे.

केसांच्या वाढीसाठी शरीरातील metabolic activity आणि hair follicles महत्त्वाची भूमिका बजावतात. यासाठी micronutrients आवश्यक असतात.

केस गळण्याची प्रमुख कारणे:

  1. Telogen Effluvium (TE): अचानक ताण, आजारपण किंवा पोषणातील कमतरता यामुळे 20–30% केस एकाच वेळी विश्रांती अवस्थेत जातात.
  2. Vitamin B3 (Niacin) ची कमतरता: diffuse alopecia म्हणजेच संपूर्ण टाळूवरून केस गळणे.
  3. केस गळण्याचे प्रकार:
    • Chronic Telogen Effluvium
    • Androgenetic Alopecia (AGA)
    • Female Pattern Hair Loss (FPHL)
    • Alopecia Areata (AA)
  4. Iron ची कमतरता: रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे केसांच्या मुळांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही.
  5. Zinc ची कमतरता: केस कमकुवत होतात आणि गळण्याचे प्रमाण वाढते.
  6. Omega-3 Fatty Acids ची कमतरता: sebum निर्मितीवर परिणाम होतो व टाळू कोरडी पडते.
  7. Vitamin D ची कमतरता: hair follicles योग्य प्रकारे कार्य करत नाहीत.

केस गळणे थांबवण्यासाठी काय करावे?

योग्य आहार:
  1. Protein: डाळी, कडधान्ये, दूध, दही, अंडी
  2. Iron: पालक, बीट, डाळिंब
  3. Zinc: भोपळ्याच्या बिया, काजू, बदाम
  4. Vitamin B-complex: संपूर्ण धान्ये, हिरव्या भाज्या
  5. Omega-3: Flaxseed (अळशी)
  6. Vitamin D: सूर्यप्रकाश, दूध
पाणी सेवन:

दररोज 8–10 ग्लास पाणी प्या.

जीवनशैलीतील बदल:
  1. ताणतणाव कमी करा
  2. पुरेशी झोप (7–8 तास)
  3. नियमित व्यायाम
  4. धूम्रपान व मद्यपान टाळा
आयुर्वेदिक उपाय:
  1. तेल मालिश
  2. क्षौर कर्म (१५ दिवसांतून एकदा)
  3. औषधी लेप
  4. पंचकर्म उपचार
नैसर्गिक उपाय:
  • Aloe vera
  • आवळा
  • भृंगराज
सल्ला:

"योग्य आहार आणि योग्य काळजी घेतल्यास केस गळणे नक्कीच कमी करता येते!"

टीप: वरील उपाय सामान्य माहितीसाठी आहेत. कोणतीही समस्या कायम राहिल्यास, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Quick Hair Test